मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एम.ए. बेबी   

मदुराई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीस पदी एम.ए. बेबी यांची रविवारी निवड करण्यात आली. सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर हे पद रिकामे झाले होते. या पदासाठी अशोक ढवळे यांचेदेखील नाव चर्चेत होते. बेबी २०१२ पासून पक्षाचे सदस्य आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रकाश करात यांनी हंगामी सरचिटणीस म्हणून काम पाहिले होते.
 
दरम्यान, पक्ष संघटनेतही अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. काल ३० नवीन सदस्यांसह ८४ सदस्यांची केंद्रीय समिती निवडण्यात आली. नवीन सदस्यांमध्ये सीकरचे खासदार अमरा राम, विजू कृष्णन, आर. अरुण कुमार, मरियम ढवळे, यू. वासुकी, के. बालकृष्णन, जितेंद्र चौधरी आणि श्रीदीप भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
 

Related Articles