‘वक्फ’ कायद्यावर राष्ट्रपतींची मोहर   

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ वर शनिवारी रात्री उशिरा स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. मागील आठवड्यात  संसदेच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक वादळी चर्चेनंतर मंजूर झाले होते. त्यानंतर, अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले होते.राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८, तर विरोधात ९५ सदस्यांनी मतदान केले. लोकसभेत २८८ सदस्यांनी समर्थन दिले, तर २३२ सदस्यांनी विरोध केला.
 
संसदेतील चर्चेत विरोधी पक्षांकडून अनेक आक्षेप नोंदवले गेले. हे विधेयक मुस्लिमविरोधी तसेच घटनाबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर, सत्ताधारी पक्षाने विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना या विधेयकातील ऐतिहासिक दुरुस्त्यांमुळे अल्पसंख्याक समुदायाला फायदा होईल म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर मुस्लिम वक्फ कायदा, १९२३ रद्द झाला असून देशात आता वक्फ कायदा, २०२५ लागू झाला आहे. या विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारे अनेक अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संघटनांचा समावेश आहे.
 

Related Articles