उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात बिकानेर-बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या (२०८४६) एका डब्यात अचानक आग लागली. त्यानंतर, रेल्वेत प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचार्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही. रेल्वेला वीज पुरवठा करणार्या पॉवर कारला तराना आणि ताजपूर दरम्यान सायंकाळी ५ च्या सुमारास आग लागली. आग तातडीने आटोक्यात आणली, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीना यांनी सांगितले.
Fans
Followers