प्रभू श्रीरामांना ‘सूर्य तिलक’   

अयोध्या : प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रविवारी भाविकांचा महापूर उसळला. रामनवमीच्या अभिजीत मुहूर्तावर प्रभू श्रीरामांच्या कपाळावर सूर्य तिलक लावण्यात आला. हा दुर्मिळ योगायोग जवळपास चार मिनिटे चालला. याच वेळी मंंदिरात आरती करण्यात आली. सूर्य तिलक स्पष्टपणे पाहता यावा, म्हणून गर्भगृहाचा दरवाजा प्रकाश बंद करण्यात आला होता. जग या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार झाले.   
 
शनिवारी सूर्य तिलकावर अंतिम चाचणी घेण्यात आली. आठ मिनिटे चाललेल्या या चाचणीत इस्रोसह आयआयटी रुरकी आणि आयआयटी चेन्नईचे तज्ज्ञही उपस्थित होते. रामनवमीला दुसर्‍यांदा प्रभू श्रीरामांच्या कपाळावर सूर्य तिलक लावण्यात आले. देशभरातील आणि जगभरातील लोकांनी त्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. गेल्या वर्षीही रामनवमीच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामांना सूर्य तिलक  लावण्यात आला होता. 

Related Articles