चित्त्यांना पाणी देणाऱ्या वन विभागाचा कर्मचारी निलंबित   

भोपाळ : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाणजार्‍या वनविभागाच्या कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाबाहेर  या कर्मचार्‍याने चित्त्यांना पाणी पाजले होते. त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर सत्यनारायण गुर्जर या कर्मचार्‍याला वनविभागाने निलंबित केले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर एक चित्रफीत झळकत आहे. त्यामध्ये काही चित्ते झाडाखाली सावलीत झोपलेले दिसत आहेत. त्यावेळी एक माणूस हातात पाण्याचा कॅन घेऊन पुढे येतो आणि त्या चित्त्यांसाठी एका ताटात पाणी ओतू लागतो. यानंतर बसलले चित्ते उभे राहतात आणि त्याच्याकडे चालत येतात. चित्ते ताटातील पाणी पितात. त्यावेळी चित्त्यांना पाणी पाजणारी व्यक्ती  छायाचित्रासाठी पोज देताना दिसत आहे. नंतर ही व्यक्ती वन विभागाचा कर्मचारी सत्येंद्रनारायन गुर्जर असल्याचे समोर आले. 
 
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात काढण्यात आला आहे. अनेकांनी चित्त्यांना पाणी देणार्‍या व्यक्तीचे कौतुक केले आहे. मात्र, वन विभागाने याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागली तर ते नागरी वस्तीजवळ राहू लागतील, अशी भीती वन विभागाच्या अधिकार्‍यांना आहे.
 

Related Articles