नाना पेठेतील जुन्या वाड्याला आग   

पुणे : नाना पेठेतील बंद असलेल्या जुन्या वाड्याला रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. मात्र, बाजारपेठेचा भाग असल्याने आग विझविताना अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या व चार पाण्याच्या टँकरद्वारे रात्री उशिरापर्यंत आग अटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.याबाबत माहिती देताना अग्निशामक दलाचे अधिकारी निलेश महाजन म्हणाले, वाडा बंद असल्याने वाड्यात मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा असल्याने आग जोरात पसरत होती. आजुबाजुला बाजारपेठ असून बाजूच्या इमारतींना आगीचा धोका निर्माण होऊ नये म्हणून अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविताना मोठी कसरत करावी लागली.

Related Articles