वारजेमध्ये जलवाहिनी पुन्हा फुटली   

पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : खडकवासला येथून वारजे जलसुध्दीकरण प्रकल्पास रॉ वाटर (प्रक्रीया न केलेले पाणी) पुरविणारी १६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी पुन्हा एकदा वारजे येथे फुटली आहे. यामुळे उद्या (मंगळवारी) शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरूस्त केल्यानंतर बुधवारी सकाळी उशीरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी सांगितले.
 
खडकवासला धरणातून वारजे जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी वारजे येथील पंधरा दिवसापूर्वी फुटली होती. त्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा वारज पोलिस चौकीजवळ १६०० मी. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.शहरात रविवारी रामनवमी असल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला नाही. तात्पुरत्या स्वरूपात उपाय योजना करण्यात आली. मात्र, या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सोमवारी रात्री हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी वारजे, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसले नगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड व खडकीचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये आवश्य तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणारा आहे.
 

Related Articles