हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा   

पुणे: कोंढवा खुर्दच्या एनआयबीएम रोडवरील संकट मोचन महादेव मंदिर परिसरातील राम मंदिरात रविवार  श्रीराम नवमी व जन्मोत्सवाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर राममय झाल्याचे पहायला मिळाले. या उपक्रमासाठी श्रीराम सेवक पवन बन्सल व परिवारातर्फे पुढाकार घेण्यात आला, तसेच माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांचे या सोहळ्याला मोठे सहकार्य लाभले.
 
रामनवनमी निमित्ताने मंदिर परिसरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती. दुपारी ठीक १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळ्याला सुरवात झाली. या वेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम व सीता माता यांची मनोभावे पूजा व  आरती करण्यात आली. तत्पूर्वी मंदिर परिसरात रामनाम व सीतानामाचा जप तसेच भजन कार्यक्रम पार पडला.
 
या कार्यक्रमाला पवन बन्सल यांच्यासह पुणे अग्रवाल समाज के अध्यक्ष ईश्वर गोयल,  भवन बन्सल, सुनीता बन्सल, अनिता रिषभ बन्सल, असीम बन्सल, जयभगवान गोयल, नरेंद्र गोयल, गुंजन नवल, संजय बन्सल, जीतेश बन्सल, संजय बन्सल, जीतेश अग्रवाल, शैलेश खंडेलवाल, योगेश जैन, पवन चमाडिया, सागर अग्रवाल रमेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने कोंढवा परिसर व शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या उपक्रमासंदर्भात बोलताना पवन बन्सल म्हणाले की, आज या ठिकाणी राम नवमीनिमित्ताने हजारोंच्या संख्येत रामभक्तांनी येऊन प्रभू श्रीराम व माता सीतेचे दर्शन घेतले. या शिवाय या ठिकाणी रामायण मन का पाठ, महाअभिषेक, महाआरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
 
बन्सल यांनी सांगितले की, ब्रदरहूडच्या वतीने राम नवमी निमित्ताने सोमवार ७ एप्रिल रोजी अल्पबचत भवन येथे संध्या काळी ५ वाजता भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक आदित्य गोयल आणि रितु पांचाल रामाची भजने सादर करणार आहेत. या भक्तिमयपूर्ण कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
 

Related Articles