लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्री स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली. मनोहरे यांचा शासकीय वसाहत परिसरात शासकीय बंगला आहे. परवा रात्री ११ च्या सुमारास जेवणानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले. यादरम्यान, अचानक गोळीबाराचा आवाज आला. ते ऐकून सुरक्षारक्षक धावत आले. आयुक्त त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आयुक्तांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार निघून गेली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
Fans
Followers