गुजरातच्या गोलंदाजांसमोर हैदराबाद ढेपाळले   

हैदराबाद : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या १९ व्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध गुजरात यांच्यात जोरदार चुरस पाहण्यास मिळाली. या सामन्याआधी गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे हैदराबादच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे हैदराबादचे फलंदाज झटपट बाद झाले. 
 
यंदाच्या हंगामात नव्या फ्रँचायझीसह नवी सुरुवात करणारा महमद सिराज आपल्या गोलंदाजीची धमक दाखवून देताना दिसत आहे. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला सिराज आता गुजरात टायटन्सचा ताफ्यातील प्रमुख खेळाडू आहे. आयपीएलआधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघातून त्याचा पत्ता कट झाला. हा त्याच्यावर अन्याय होता असा सूरही उमटला. पण जे काही झालं ते त्याच्या भल्याचं ठरताना दिसत आहे. ही गोष्ट आगामी हंगामात सिराजसह त्याच्या फ्रँचायझी संघाला कितपत फायद्याची ठरणार ते बघण्याजोगे असेल. 
 
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोहम्मद सिराज याने नव्या फ्रँचायझीकडून खेळताना नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना आपल्यातील धमक दाखवून दिली. पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध ५४ धावा खर्च करताना त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण जबरदस्त कमबॅक करताना त्याने आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणार्‍या रोहित शर्माचीच शिकार केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा त्रिफळा उडवत त्याने यंदाच्या हंगामातील पहिला बळी आपल्या खात्यात जमा केला.
 

Related Articles