जगातल्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाचे पंतप्रधान मोदींकडून उदघाटन   

तामिळनाडू : रामनवमीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन होत आहे. पुलाची लांबी २.७ किलोमीटर एवढी आहे. आणि या पुलाच्या निर्मितीसाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याच्या कोणशिलेचा कार्यक्रम करण्यात आला होता आणि आज याच पुलाचे उद्घाटन होत आहे. हा जगातला पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल आहे. 
 
या पुलाची क्षमता जबरदस्त आहे, त्यावर हाय स्पीड रेल्वे सुद्धा धावू शकतील आणि म्हणून हा पूल एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. या पुलावरून ताशी ५० कि.मी वेगाने रेल्वे धावेल. बऱ्याच ठिकाणी रेल्वेच्या प्रवासाला अनेक दिवस लागतात,हा प्रवास जास्त वेळचा होतो. आपल्याकडे तेवढ्या जास्त क्षमतेचे  रेल्वे रूळ उपलब्ध नाहीत, त्यामुळे आता जे नवे रेल्वे रूळ, नवा पूल बनत आहे त्या ठिकाणी रेल्वे रूळसुद्धा हाय स्पीड कपॅसिटीचे वापरले गेलेले आहेत. या पुलामुळे  कुठेतरी देशातील दळण वळणासाठी फायदा होणार आहे.

Related Articles