फडणवीस यांच्या उपस्थितीत राम-सीता स्वयंवर, सखी गीतरामायणाचा सोहळा   

पुणे : ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राम नवमीच्या पूर्वसंध्येला  सखी गीतरामायण आणि राम-सीता स्वयंवर या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडले. या कार्यक्रमात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला आणि भक्तीमय अनुभवाचा लाभ घेतला.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासोबत खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर यांच्या सोबत अनेक ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले, की भगवान श्रीराम हे केवळ धर्म आणि मर्यादेचे प्रतीक नसून, भारताच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे मूळ आहेत. आज या अद्वितीय कार्यक्रमाला उपस्थित राहून मी स्वतःला भाग्यवान समजतो. गीतरामायणाची सादरीकरण आणि राम-सीता स्वयंवराचे नाट्य सादरीकरण इतके भव्य आणि सुंदर झाले की प्रत्येक प्रेक्षक भावविव्हल झाला. ही एक अशी सांस्कृतिक गोष्ट आहे जी आपल्या परंपरेला जिवंत ठेवते, आणि यासाठी मी ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉ. मिहीर कुलकर्णी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.कार्यक्रमात सखी गीतरामायणाचे सादरीकरण झाले. त्यानंतर झालेल्या राम-सीता स्वयंवरच्या नाट्य सादरीकरणात भगवान श्रीरामांचे गुणगान आणि जनकपुरात झालेल्या स्वयंवराची भव्य झलक सादर करण्यात आली. देखणा मंच, संगीतमय सादरीकरण आणि भक्तिपूर्ण वातावरण यामुळे उपस्थित प्रत्येक प्रेक्षक श्रीरामभक्तीमध्ये रंगून गेला.

Related Articles