लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार   

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. आरोपीने पीडीत मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देण्याची आणि त्यांना संपवण्याची धमकी वारंवार दिली होती. तसेच, पीडीत मुलीचे आक्षेपार्ह छायाचित्र पसरवण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. अक्षय सुनिल ढमाले (वय २६, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी, एका १७ वर्षाच्या युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आंबेगाव, कात्रज आणि शहरात विविध ठिकाणी जुलै २०२२ पासून ३ एप्रिल २०२५ या काळात हा प्रकार घडला. अक्षय ढमाले हा व्हॅनचालक आहे. शाळेमध्ये मुलांना सोडण्याच्या कामातून त्याची या पिडितीशी ओळख झाली. त्याने पीडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तसेच, तिच्या कुटुंबीयांना त्रास देण्याची व मारुन टाकण्याची धमकी देऊन त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. हे छायाचित्र समाजमाध्यमावर पसरवण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून तिने शेवटी पोलिसांत धाव घेतली. त्यानंंतर, पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अक्षय ढमाले याला अटक केली.

Related Articles