न्यूझीलंडकडून पाकिस्तानला ’व्हाईटवॉश’   

बे ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने अतिशय सुमार कामगिरी केली. परिणामी त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांची खराब कामगिरी अजूनही सुरुच आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानवर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. पहिले दोन गमावल्यानंतर तिसर्‍या सामन्यातही न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेट संघाचा पराभव केला. बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात किवी संघाने ४३ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-० ने जिंकली. पावसामुळे हा सामना ४२ षटकांचा करण्यात आला होता. 
 
हवामान लक्षात घेऊन पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ केवळ ४० षटकांत २२० धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने शानदार गोलंदाजी केली आणि ५ बळी  घेतल्या.
 
पावसामुळे कमी करण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १६४ धावात ४ बळी गमावले होते. त्यामुळे मोठी धावसंख्या गाठणे कठीण वाटत होते. पण कर्णधार मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५९ धावा केल्या. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे किवी संघाने ४२ षटकांत २६४ धावा केल्या. या आव्हानाचा बचाव करताना, बेन सीयर्सने पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने ९ षटकांत फक्त ३४ धावा देऊन ५ बळी घेतल्या.
 
संपूर्ण मालिकेत सियर्सने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याने त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. २६५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला तिसर्‍या षटकात मोठा धक्का बसला. पाकिस्तानी संघाने विकेट गमावली नाही, पण दुखापतीमुळे सलामीवीर इमाम उल हक दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी उस्मान खानला ’कन्कशन सब’ म्हणून खेळवण्यात आले. यानंतर बाबर आझम-अब्दुल्ला शफीक यांनी डाव सावरवण्याचा प्रयत्न केला.

Related Articles