नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२५ च्या वैधतेला शुक्रवारी सर्वोेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. काँग्रेस खासदार महमद जावेद आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हे विधेयक घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करते, असे जावेद यांनी अर्जात म्हटले आहे. या विधेयकाने वक्फ मालमत्ता आणि त्यांच्या व्यवस्थापनावर मनमानी निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे ‘वक्फ‘ची स्वायता कमी झाली असल्याचे जावेद यांनी म्हटले आहे. जावेद यांनी वकील अनस तन्वीर यांच्यामार्फत हा अर्ज दाखल केला आहे.प्रस्तावित कायदा भेदभाव करणारा आहे. यामुळे अनेक अवाजवी निर्बंध आले आहेत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. वकील लजफीर अहमद यांच्यामार्फत त्यांनी अर्ज दाखल केला आहे.जावेद हे ‘वक्फ’ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते. ते बिहारमधील किशनगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
Fans
Followers