ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले   

नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहाल देश आणि विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या पाच वर्षांत तो पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. कारण तिकिटाची विक्री वाढली आहे. या संदर्भातील आकडेवारी सरकारने संसदेत दिली.ताजमहालचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. तिकिटांची विक्री विभागाकडून केली जाते. 
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी या संदर्भातील आकडेवारी लेखी उत्तरात गुरुवारी दिली. गेल्या पाच वर्षांत ताजमहालच्या प्रवेश तिकिटांच्या विक्रीची संख्या वाढली आहे. त्यानी २०१९ -२०२० ते २०२३- २०२४ दरम्यानची आकडेवारी सादर केली. आर्थिक वर्ष २०१९ ते २०२० दरम्यान, आग्रा किल्ला आणि दिल्लीतील कुतुब मीनार तिकीट विक्रीत दुसरा आणि तिसरा होता. २०२० ते २०२१ मध्ये तामिळनाडूतील मल्लापुरम पर्यटन स्थळ आणि कोणार्क येथील सूर्यमंदिर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होते. २०२३ ते २०२४ दरम्यान दिल्लीचा कुतुब मीनार आणि लाल किल्ला दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता, असे त्यांनी सांगितले.

Related Articles