उत्तर भारतात उष्णतेची लाट येण्याचा इशारा   

नवी दिल्ली : उत्तर भारतात प्रामुख्याने वायव्य भागात पुढील सहा दिवसांत उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी दिला. 
दिल्लीचे तपमान ४२ अंंशावर पोहोचण्याचा अंदाज आहे. दिल्ली, दक्षिण हरयाना, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्तान आणि पश्चिम मध्य प्रदेशाला लाटेचा तडाखा बसणार आहे. मध्य आणि उत्तर भारतातील तपमानाचा पारा २ ते ४ अंशांनी वाढणार आहे. दिल्लीचे दिवसाचे तपमान ६ आणि ७ एप्रिल रोजी ४२ अंशावर जाण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून दरम्यान मध्य आणि पूर्व भारतात व वायव्य भागात उष्ण दिवस असतील. सर्वसाधारणपणे एप्रिल आणि जूनमध्ये चार ते सात उष्णतेच्या लाटा येतात.
 
राजस्तान, गुजरात, हरयाना, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा उत्तर भाग आणि तामिळनाडू यांना उष्णतेच्या लाटेचा हमखास फटका बसतो. उत्तर प्रदेशातील पूर्व भाग, झारखंड, छत्तीसगढ आणि ओडिशात १० ते १ उष्णतेच्या लाटा या कालखंडात येतात.दरम्यान, गेल्या वर्षी उन्हाळा कडक होता. ५३६ उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. १४ वर्षांतील तो एक उच्चांक होता. गेले वर्ष अतिशय उष्ण ठरले होते. भारताचा त्यात समावेश होता. यंदा २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी उष्णतेची लाट आली होती. गेल्या वर्षी ५ एप्रिलला पहिली उष्णतेची लाट आली होती. 

Related Articles