डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने ५० व्यावसायिकांना शिष्यवृत्ती   

राजकारणात प्रवेशाची संधी देणार

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने काँग्रेसने शिष्यवृत्ती देण्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. आधुनिक भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी  देशातील ५० व्यावसायिकांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांना राजकारणात येण्याची संधी दिली जाणार आहे. 
    
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतातील बुद्धिमान व्यक्तींना राजकारणात आणले जाणार आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून व्यावसायिकांना सार्वजनिक जीवनात प्रवेश करता येईल, ते देशाची एकात्मतेला चालना देतल आणि विकासातही योगदान देतील. प्रति वर्षी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रीय समन्वयक के. राजू, जनसंपर्क विभागाचे प्रमुख पवन खेरा, व्यावसायिक काँग्रेस आणि माहितीचे विश्लेषक प्रवीण चक्रवर्ती उपस्थित होते. ते म्हणाले, देशभरातून ५० व्यावसायिकांना अशा प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 

Related Articles