विमानतळाला शेतकर्‍यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू   

सासवड (वार्ताहर) : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकर्‍यांनी विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांनी सासवड (ता. पुरंंदर) येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणास बसले आहेत. या वेळी शेतकर्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आपला ठाम विरोध असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधात बाधीत शेतकर्‍यांचे आमरण उपोषणा मध्ये पुरंदर तालुक्यातील एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, या गावांवर शासनाने जबरदस्तीने विमानतळ लादत आहे. सरकारे सर्वेक्षण भुसंपादन जबरदस्तीने सुरू केले आहे. या निषेधार्थ शेतकर्‍यांचे आमरण उपोषण सुरू आहे. 
 
राज्यकर्त्यांनी आपल्या जमिनी द्याव्यात
 
कोणत्याही परिस्थितीमध्ये विमानतळाला आमचा विरोध आहे. ज्यांना विमानतळ व्हावे असे वाटते त्या राज्यकर्त्यांनी आपल्या जमिनी द्याव्यात. सामान्य शेतकर्‍यांना वेठीस धरु नये, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी सांगितले. यावेळी पंचायतसमिती माजी शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, पारगावचे सरपंच ज्योती मेमाणे, उपसरपंच चेतन मेमाणे, एखतपुरच्या सरपंच शितल टिळेकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड, निरा मार्केट कमिटिचे माजी सभापती महादेव टिळेकर, नामदेव कुंभारकर, सतिश कुंभारकर, रामदास होले, मनिष हगवणे, विकास कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, देविदास कामठे, कुंभारवळण माजी सरपंच अमोल कामठे, महादेव कुंभारकर, प्रताप कुंभारकर, हरिभाऊ मेमाणे, मच्छिंद्र कुंभारकर, गौरव जगताप, वर्षा मेमाणे, अनिल मेमाणे, सुनिल मेमाणे, राजेंद्र कुंभारकर आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles