शेअर बाजाराची घसरगुंडी   

मुंबई : वाढत्या जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीचे पडसाद शेअर बाजारावर कायम आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी ९०० अंकांनी कोसळून ७६,००० च्या खाली आला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३४५.६५ अंकांनी २३,००० खाली आला.काल निर्देशांक १.२२ टक्क्यांनी म्हणजे ९३०.६७ अंकांनी घसरून ७५,३६४.६९ वर स्थिरावला. सत्रांतर्गत निर्देशांक १.३८ टक्के म्हणजे १,०५४.८१ अंकांनी घसरून ७५,२४०.५५ पर्यंत खाली आला होता. अखेरच्या सत्रात निर्देशांक काहीसा सावरला.
 
एनएसईचा निफ्टी १.४९ टक्के म्हणजे ३४५.६५ अंकांनी घसरुन २२,९०४.४५ वर बंद झाला. सत्रांतर्गत निफ्टी ३८२.२ अंकांनी घसरला होता. तसेच, २२,८६७.९० पर्यंत खाली आला होता. काल टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक ८.५९ टक्क्यांनी घसरले. यासोबतच, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मास्युटिकल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एनटीपीसीचे समभाग पिछाडीवर होते. 

Related Articles