नवी दिल्ली : लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात शुक्रवारी दहा ग्रॅममागे १,३५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे, काल सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ९३,००० होता, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने सांगितले. गुरुवारी प्रति दहा ग्रॅम सोन्यासाठी ९४,३५० रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, चांदीच्या दरात चार महिन्यानंतर मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात काल प्रति किलो ५ हजारांची घसरण झाली. सध्या चांदी ९५,५०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो चांदीसाठी ९५,५०० रुपये मोजावे लागत होते.
Fans
Followers