कृत्रिम बुद्धीमत्तेत भारत मोठी प्रगती करेल   

चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

पुणे : देशात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स वापराचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रात देशाने उशिराने सुरवात केली असली तरी, भविष्यात आपला देश मोठी प्रगती करेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
 
पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि एमईएसचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सचिव रोहन दामले, शिक्षण संचालक नेहा दामले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. संजय सोनावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ. श्रद्धा नाईक, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, एमईएसच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. सुदाम शेळके आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक डॉ. उमेश बिबवे आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles