नवीन विमानतळ ते एरोमॉल वातानुकूलित बससेवा   

पुणे : पुणे विमानतळावर प्रवाशांना फीडर सेवेसाठी (नवीन टर्मिनल ते एरोमॉल) तीन नवीन वातानुकुलित (एसी) बस सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय साय गोल्फ कार्टच्या माध्यमातून सुध्दा येथे फीडर सेवा पुरवली जात आहे. यामुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
 
याबाबत संचालक संतोष ढोके म्हणाले, पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल ते एरोमॉलपर्यंत प्रवाशांना अवजड सामानाच्या बॅगा घेऊन कसरत करावी लागत होती. त्यादृष्टीने आम्ही प्रवाशांसाठी तीन वातानुकुलित बस आणि सात गोल्फ कार्टची व्यवस्था केली आहे. याशिवाय फक्त ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांसाठी नवीन टर्मिनलसमोरच टॅक्सी उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था केली आहे. यासाठी आम्ही नवीन टर्मिनलसमोरच एक हेल्प डेस्क उभारला असून, तेथे आमचे कर्मचारी २४ तास सेवेकरिता उभे असतात.
 
पुणे विमानतळावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत आहे. येथून होणारी दैनंदिन उड्डाणे आणि प्रवासी संख्या पहाता ही बससंख्या अपुरी आहे. यातच आता उन्हाळी सुट्ट्यांमुळे येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक होणार आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने येथील फीडरसाठी असलेली वातानुकुलित बससंख्या वाढवावी. यामुळे प्रवाशांना फायदा होईल, अन्यथा नवीन टर्मिनल ते एरोमॉलपर्यंत अवजड सामान घेऊन आमच्यासह ज्येष्ठ विमान प्रवाशांन अवजड बॅगा घेऊन पायपीट करावी लागेल. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देऊन अतिरिक्त बस वाढवण्याची उपाययोजना करावी. अशा भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. 

Related Articles