टोळक्याकडून वाहनांची तोडफोड   

नवी खडकी : संगमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या पाटील इस्टेट भागातील महात्मा गांधी वसाहतीत टोळक्याने कोयते उगारून तीन ते चार दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार झाल्याचे समोर आले आहे.
   
पाटील इस्टेट हा भाग खडकी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असल्याने याबाबत सय्यद नूरजहाँ इराणी (वय ५६, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लॉट, पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता) यांनी खडकी पोलीस ठाण्यात पाच जणा विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून खडकी पोलिसांनी राजजूनी फौजानसिंग याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला| राजजूनी आणि साथीदार बुधवारी रात्री महात्मा गांधी वसाहतीत शिरले. आरोपींनी कोयते उगारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी दहशत माजवून वसाहतीत लावलेल्या तीन ते चार दुचाकींची तोडफोड केल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेने लोकांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतू पोलिसात तक्रार दिल्यावर सर्व आरोपी फरार झालेच कसे असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे खडकी पोलिसांबाबत स्थानिक नागरिक शंका घेत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले करत आहेत.

Related Articles