लखनऊचा १२ धावांनी विजय   

लखनऊ : मुंबईविरुद्ध लखनऊ यांच्यात शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात लखनऊचा १२ धावांनी विजय झाला. या सामन्याआधी मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा मुंबईचा निर्णय चुकीचा ठरला. या सामन्यात लखनऊचा सलामीवीर मिचेल मार्श याने ३१ चेंडूत ६० धावा केल्या. यावेळी त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या या संयमी अर्धशतकामुळे लखनऊच्या संघाने जोरदार सलामी दिली. त्याला साथ देताना मार्कराम याने ५३ धावा केल्या. आणि लखनऊसाठी दुसरे अर्धशतक केले.
 
त्यानंतर  तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या पुरन याने १२ धावा केल्या. हार्दिक पांड्या याच्या शानदार गोलंदाजीवर दीपक चहर याच्याकडे तो झेलबाद झाला. रिषभ पंत याने २ धावा करून तंबूत माघारी परतला. आयुष बडोनी याने ३० धावा केल्या. आश्विन कुमार याने चांगली गोलंदाजी करत रिकलटनकडे त्याला झेलबाद केले. त्यानंतर डेविड मिलर याने २७ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या याने चकविणारा चेंडू टाकत नमन धीरकडे त्याला झेलबाद केले. अब्दुल समाद याने ४ धावा केल्या. बोल्ट याच्या जबरदस्त गोलंदाजीवर नमन धीरकडे झेल देत समाद बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूर याने नाबाद ५ धावा केल्या. आकाशदीप हा शून्यावर बाद झाला. हार्दीक पांड्या याच्या जबरदस्त गोलंदाजीवर सँटनरकडे तो झेलबाद झाला. आवेश खान याने नाबाद २ धावा केल्या. तर लखनऊच्या संघाला ८ अवांतर धावा मिळाल्या. लखनऊच्या गोलंदाजांपैकी शार्दुल ठाकूर, आकाशदीप, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. रवी भिष्णोईला एकही फलंदाज बाद करता आला नाही.मुंबईच्या फलंदाजांनी मिळालेले २०४ धावांचे आव्हान पार करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. शेवटच्या क्षणी सामना जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. मुंबईच्या फलंदाजांपैकी हार्दिक पांड्या २८ धावांवर बाद झाला. तर सुर्यकुमार यादव याने ६७ धावा करत केलेले अर्धशतक वाया गेले. आवेश खान याने अब्दुल समद याच्याकडे झेल देत सुर्यकुमारला बाद केले. तिलक वर्मा अवघ्या २५ धावांवर बाद झाला. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
लखनऊ : मिचेल मार्श ६०, मार्कराम ५३, पुरन १२, पंत २, आयुष बडोनी ३०, मिलर २७, अब्दुल समद ४, ठाकूर ५, आवेश खान ० एकूण २० षटकांत २०३/८
मुंबई : सुर्यकुमार यादव ६७, हार्दिक पांड्या २८, नमन धीर ४६, रिकलटन १०, विल जॅक ५, तिलक वर्मा २५, सॅन्टनर २ अवांतर ८ एकूण २० षटकांत १९१/५

Related Articles