व्हॉट्सऍप कट्टा   

वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा! 
माणसं बदलत जातील, तुम्ही स्विकारत जा
परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा|
येणारे दिवस निघून जातील,तो क्षण जपत जा|
विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा|
प्रसंग परीक्षा घेत जाईल,तुम्ही क्षमता दाखवत जा!!
----------
एक हृदयस्पर्शी सत्यकथा
४-५ मुले चकित होऊन सुमारे १ कोटी किमतीच्या मर्सिडीज कारकडे पाहत होती, तेव्हा ती व्यक्ती आली आणि त्यांनी मुलांना त्यांची इच्छा विचारली. मुलांनी सांगितले की त्यांना या गाडीवर थोडा वेळ खेळायचे आहे... 
त्या व्यक्तीला आपलं बालपण आठवलं.. आणि भावूक होऊन तो या मुलांना म्हणाला, जा मुलांनो... वाटेल तोपर्यंत खेळा आणि गाडीकडे जा...
गाडीच्या बोनेटवर, छतावर, डिकीवर, सगळीकडे चढताना मुलं आनंदाने खेळत होती. गाडीवरच्या डेंटची पर्वा न करता तो माणूस या मुलांना खेळताना पाहत राहिला. मुलांना खेळताना पाहून तो आनंदी आणि भावूक होत होता, त्याचे डोळे ओले होते. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे त्या व्यक्तीचा या मुलांशी काही संबंध नव्हता. आणि ना त्या मर्सिडीज कारशी...
----------
गण्या अभ्यास करत बसलेला असतो.
आई (स्वयंपाकघरातून) : बाळा! जेवायला काय बनवू?
गण्या : मम्मी! ऑप्शन्स काय आहेत?
आई : राईस, चावल की भात?
मन्या आभ्याससोडून खेळायला निघून जातो.
----------
वपुंच्या कथा आणि कादंबर्‍या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे
 
• सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात 
• सर्वात जीवघेणा क्षण कोणता?
खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. 
• सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. 
• प्रेम म्हणजे काय?
दुसर्‍याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. 
• माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो. 
• स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसर्‍याला देऊ शकतो. 
• माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. 
• हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. 
• सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. 
• चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. 
• स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त बापच विकत घेऊ शकतो. 
• खर्च केल्याचे दुःख नसते हिशोब लागला नाही की त्रास होतो. 
• सर्वात जवळ असणार्‍या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही. 
• नातवंडं झाल्यावर म्हातार्‍याचा विरोध बोथट होतो म्हणतात. 
• माणसाने समोर बघायचे का मागे यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते. 
• मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं.
एका वेळेला एकच साधता येते. स्वतःचं सुख नाहीतर दुसर्‍याचं मन.
• लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात. 
• आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो. 
• समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं. 
• अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?
• जो गेल्यानंतरच कळतो त्याला तोल म्हणतात.
------------

Related Articles