बँकॉक : सुमारे एक आठवड्यापूर्वी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या गुरुवारी वाढून तीन हजार ८५ वर पोहोचली आहे. कारण शोध आणि बचाव पथकांना आणखी मृतदेह सापडले, असे लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारने सांगितले. लष्कराने सांगितले, की आणखी चार हजार ७१५ नागरिक जखमी झाले, तर ३४१ अजूनही बेपत्ता आहेत. ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर मंडालेजवळ होता. यात हजारो इमारती पाडल्या, रस्ते खराब झाले आणि अनेक भागांत पूल उद्ध्वस्त झाले आहेत.
Fans
Followers