बिम्सटेक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौर्‍यावर   

बँकॉक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी दोन दिवसांच्या थायलंड दौर्‍यावर पोहोचले. येथे त्यांनी थायलंड त्यांचे समकक्ष पँतोगटार्न शिनावात्रा यांच्याशी चर्चा केली.थायलंड पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथे त्यांना ’गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले. यावेळी तेथे रामकीन-थाई म्हणजेच रामायणाचे मनमोहक सादरीकरणही करण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी समाज माध्यमाद्वारे दिली.
 
रणधीर जैस्वाल म्हणाले, या भेटीत पंतप्रधान भारत-थायलंड भागीदारीचा मार्ग मोकळा करण्यासाठी थायलंडच्या नेत्यांसोबत व्यापक चर्चा करतील.पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, की हा एक अनोखा सांस्कृतिक संबंध! थाई रामायण, रामकीनचे मनमोहक सादरीकरण पाहिले. थायलंडच्या दौर्‍यानंतर मोदी श्रीलंकेला भेट देणार आहेत. 

Related Articles