’आम्ही केवळ लाभ मिळवण्यासाठी सहकार्य करत नाही’   

जयशंकर यांचे मोहम्मद युनूस यांना चोख प्रत्युत्तर 

बँकॉक : बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या भारताच्या ईशान्य क्षेत्राबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चोख गुरुवारी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की बंगालच्या उपसागरात भारताला सुमारे ६ हजार ५०० किलोमीटरची सर्वात लांब किनारपट्टी आहे. आम्ही केवळ लाभ मिळवण्यासाठी सहकार्य करत नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मोहम्मद युनूस सध्या बांगलादेश-पाकिस्तान संबंध मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असेही त्यांनी नमूद केले.  
 
थायलंडमधील सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेत ते बोलत होते. जयशंकर म्हणाले, भारताची फक्त सीमाच बिम्सटेक सदस्य असलेल्या देशांसोबतच नाही, तर या क्षेत्रात दळणवळण वाढण्यासाठी काम आम्ही करत आहोत. ईशान्येकडील राज्यात रस्ते, रेल्वे, जलवाहतूक आणि पाइपलाइनचे जाळे विस्तृत करण्याचे काम केले जात आहे’. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस म्हणालेे होते, की भारताच्या ईशान्येकडील राज्यात चीनला विस्ताराची संधी आहे. भारतातील ईशान्येकडील सात राज्ये अजूनही लॅण्डलॉक, अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढली गेलेली आहेत. बांगलादेश हा या प्रदेशातील महासागराचा एकमेव संरक्षण आहे. भारतातील ईशान्येकडील सात राज्यांना समुद्रापर्यंत पोहचण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या प्रदेशासाठी महासागराचे एकमेव संरक्षक आहोत. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था इथे वाढू शकते, असे मोहम्मद युनूस म्हणाले होते. 
 

Related Articles