प्रदूषण कमी करण्यासाठी ’फॉग कॅनॉन’चा वापर   

पुणे : शहरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पुणेकरांना श्वासनाचे तसेच घशाच्या आजाराने त्रस्त झाले आहे. त्यावर महापालिकेकडून उपाय योजना केल्या जात होत्या. मात्र, त्यापुरेशा प्रमाणात नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. आता मात्रा या त्रासापासून पुणेकरांची मुक्तता होणार आहे. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन या मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरील धुळीचे प्रमाणकमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.  
 
महापालिकेच्या आवारात फॉग कॅनॉन मशीनचे बुधवारी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोगाम (एनसीएुपी) मधील १५ व्या वित्तीय आयोग अंतर्गत भारतातील १३० शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हवा प्रदूषणामध्ये पीएम १० (१० मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण) व पीएम २.५ (२.५ मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण) अशा धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून एनसीएपीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेसाठी पुणे महापालिकेमार्फत ५ परिमंडळसाठी प्रत्येकी १ असे एकूण ५ फॉग कॅनन मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत.
 
फॉग कॅनॉन मशीनसाठी एका सीएनजी इंधन वापरणार्‍या ट्रकच्या चासीवर ६००० लिटरची स्टीलची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस २२ नोझल असलेले ३ किलोवॉटचा हाय प्रेशन पंप पॉवर असलेले फॉग कॅनॉन मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये २२ पाण्याचे नोझल बसविणात आले असून  त्यामधून १० किलो सेक्वेर सेमी एवढ्या प्रेशरने ५० मायक्रॉन पर्यंतचे पाण्याचे अतिसूक्ष्म कण बाहेर फेकले जातात.  यामुळे  हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारच्या मशीन्स दिल्ली, चंडीगड, मीराभायंदर, पिंपरी-चिंचवड व इतर शहरांमध्ये वापरण्यात येत आहे. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाणकमी करणेच्या दृष्टीने फॉग कॅनॉन मशीनचा वापर करण्यात येणार असून शहरातील खालील  प्रमुख रस्त्यांवर याचा वापर करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त शहरामध्ये इतर आवश्यक ठिकाणी देखील या मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

 

Related Articles