भंडार्‍यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू   

भंडारा : भंडार्‍यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर एकजण थोडक्यात बचावला. तुमसर तालुक्यातील पाथरी शेत शिवारात गुरूवारी सकाळी ही घटना घडली. मनीषा भारत पुष्पतोडे (वय २५) आणि प्रमोद मणिराम नागपुरे (४५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही तुमसर तालुक्यातील पाथरी येथील रहिवासी आहेत.
 
भंडार्‍यात गुरूवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी पिकांचा हंगाम सुरू असल्याने शेतातील कामे करण्यासाठी सकाळीच मजूर शेतात गेले होते. पुष्पतोडे आणि नागपुरे हे दोघे देखील शेतातील कामासाठी गेले होते. शेतात काम करत असतानाच अचानक आलेल्या वादळी  पावसाला सुरवात झाली. यात वीज कोसळून दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी मनीषा पुष्पतोडे यांचे सासरे ही या शेतात काम करीत होते. मात्र ते त्यांच्यापासून दूर असल्याने थोडक्यात बचावले.

Related Articles