मोटार-एसटी बस अपघातात एक ठार   

रत्नागिरी : मोटार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 
 
विकास नौसरे (वय ३४, रा. मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. स्वस्ति फायनान्स या मायक्रो फायनान्स कंपनीच्या मोटारीची आणि एसटी बसची  समोरासमोर धडक झाली. मोटारीत कंपनीचे पाच कर्मचारी होते. हे सर्वजण   चेंबूरमधून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. अपघातात विकास नौसरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते कंपनीत युनिट व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles