मुंबई : शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी मुंबईत दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. आजपासून (शुक्रवार) ५ मे पर्यंत ही बंदी असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.
Fans
Followers