अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या अव्वलस्थानी   

मुंबई : हार्दिक पांड्या हा काल जाहीर झालेल्या टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत २५२ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अक्षर पटेल हा १३व्या स्थानावर असून फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड पहिल्या आणि अभिषेक शर्मा दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसन्या, तिलक वर्मा चौथ्या आणि सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे.
 
पाकिस्तानविरुद्ध मालिका विजयानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफी याने आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. तर भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याची टी-२० क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर घसरण झाली. गेल्या दोन महिन्यांत भारताने एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्यामुळे गोलंदाजीत भारतीय खेळाडूंना फटका बसला आहे. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने ऑलराऊंडर यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
 
दरम्यान, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकव डफी पहिल्यांदाच नंबर १ टी-२० गोलंदाज बनला, पाकिस्तानविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने ८.३८च्या सरासरीने १३ बळी घेतले. डफीच्या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तानला ४-१ ने हरवून मालिका जिंकली, २०१८ मध्ये ईश सोढीनंतर डफी हा पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकविणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू बनला आहे.

टी-२० गोलंदाजी क्रमवारी

जेकब डफी (न्यूझीलंड)
अकील हुसेन (वेस्ट इंडिज)
वरुण चक्रवर्ती (भारत)
आदिल रशीद (इंग्लंड)
वानिंदू हसरंगा (श्रीलंका)
अडम झॅम्पा (ऑस्ट्रेलिया)
रवी बिश्नोई (भारत)
महीश तिक्ष्णा (श्रीलंका)
राशिद खान (अफगाणिस्तान)
अर्शदीप सिंग (भारत)
 

Related Articles