म्यानमार भूकंप क्षेत्रातून तरुणाला वाचवले   

पाच दिवस सुरू होती जीवन मरणाची झुंज

बँकॉक : म्यानमारला नुकताच प्रलंयकारी भूकंपाचा तडाखा बसला होता. हजारो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या होत्या. तब्बल पाच दिवसांनंतर एका तरुणाला ढिगार्‍याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. गेल्या शुक्रवारी म्यानमार, थायलंड परिसराला ७.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. म्यानमारमध्ये प्रचंड हानी झाली होती. राजधानी नायपीताव येथील हॉटेलच्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली तो अडकून पडला होता. त्याला आता बाहेर काढण्यात यश आले. सुमारे १०८ तास खटपट करुन मदतकार्य पथकाने त्याची ढिगार्‍याखालून सुटका केली.  अंगावर शर्ट नव्हता आणि धुळीने तो माखला होता. गेले पाच दिवस तो जीवन आणि मरणाची लढाई एकटाच लढत होता. तुर्किये आणि स्थानिक मदत पथकाने त्याची सुटका केली आहे. दरम्यान, भूकंपात २ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५२१ जखमी झाले. 

Related Articles