डेमोक्रॅटीक खासदाराचे २३ तास सलग भाषण   

वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रमुख विरोधी पक्ष डेमोक्रॅटीकचे खासदार कोरी बुकर यांनी सिनेटमध्ये सलग २३ तास भाषण करण्याचा विक्रम केला आहे. भाषणात त्यांनी ट्रम यांच्या धोरणावर कडाडून टीका करुन देशात विरोधी पक्ष जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यावर बुकर यांनी भाषणात तोंडसुख घेतले. मंगळवारी दुपारनंतर त्यांनी भाषणास सुरूवात केली होती. ते बुधवारी सकाळपर्यंत सुरू होते. प्रथम त्यांनी २१ तास भाषण केल्याचे सांगण्यात आले. नंतर मात्र, त्यांचे भाषण २३ तास झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेच्या इतिहासातील ते दुसरे प्रदीर्घ भाषण होते. सामाजिक सुरक्षेवर आणि घटनेवर हल्ला ट्रम्प सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचा रोख उद्योगपती अ‍ॅलन मस्क आणि ट्रम्प यांच्या दिशेने प्रामुख्याने होता. 

Related Articles