अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन   

लॉस एंजलीस : अमेरिकेचे अभिनेते व्हाल क्लिमर यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. टॉप गन आणि बॅटमन फॉरेएव्हर, द डोअर या सारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले होते. घशाच्या कर्करोगाने आजारी ते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निमोनिया झाला होता मंगळवारी लॉस एंजलीस येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी मर्सिडिस आहे. 
 
क्लिमर यांनी १९८० आणि ९० दशकांत बहारदार अभिनय करुन हॉलीवूड गाजवले होते.  सर्वोत्कृष्ट व्यक्ती आणि कामात आनंद लुटणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. १९८४ मध्ये त्यांनी स्पाय स्पूफ टॉप सिक्रेट या चित्रपटात प्रथम अभिनय केला. त्यानंतर रिअल जीनियस, मॅकगर्बर आणि किस किस बँग बँग या विनोदी चित्रपटांतही काम केले होते.

Related Articles