नवी दिल्ली : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी तिसरी नोटीस पाठवली आहे. कामरा याला ५ एप्रिल रोजी हजर राहून जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी, दोन वेळा समन्स पाठवूनही तो चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता तिसर्यांदा नोटीस बजावली आहे. कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक कविता म्हटली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळातही पाहायला मिळाले होते. दरम्यान, कामरा याने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर, न्यायालयाने कामरा याला ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले.
Fans
Followers