भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल   

सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली : छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सहा हजार कोटींच्या महादेव अ‍ॅप ऑनलाइन बेटिंग गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बघेल यांना आरोपी क्रमांक सहा बनवण्यात आले आहे. 
 
मागील आठवड्यात सीबीआयने बघेल यांच्या निवासस्थानासह ६० ठिकाणी छापे घातले होते. यात भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांसह अनेक राजकारणी, नोकरशहा आणि पोलिस अधिकार्‍यांच्या ठिकाणांचा समावेश होता. या प्रकरणात सीबीआयने महादेव अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल, सौरभ चंद्राकर, आशिम दास, सतीश चंद्राकर, चंद्रभूषण वर्मा, भीम सिंह यांसह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बघेल यांच्या कार्यकाळात महादेव अ‍ॅपला संरक्षण देण्यात आल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात, तत्कालीन मुख्यमंत्री बघेल यांना ५०८ कोटी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Related Articles