नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘एनसीएईआर’ च्या महासंचालक पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व बँकेच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केली आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे. एम. डी. पात्रा यांनी जानेवारीमध्ये उपगव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिकामे होेते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) पूनम गुप्ता यांच्या रिझर्व बँकेच्या उपगव्हर्नर पदाच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, त्या आपल्या कार्यभार स्वीकारण्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळतील. सध्या गुप्ता या देशातील सर्वांत मोठ्या आर्थिक धोरण संशोधन संस्था एनसीएईआरच्या महासंचालक आहेत. त्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आहेत तसेच १६ व्या अर्थ आयोगाच्या सल्लागार समितीच्या संयोजक म्हणूनही कार्यरत आहेत.
Fans
Followers