चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव   

नवी दिल्ली : रेल्वेच्या सुरक्षेत सुधारणा झाली असल्याने अपघातांचे प्रमाण तुलनेत घटले आहे. अपघातांची संख्या ४०० वरुन कमी होत ती ८१ झाली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बुधवारी दिली.
 
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. ते म्हणाले, नवीन तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळे देशातील रेल्वे अपघातांची संख्या कमी झाली आहे.  रेल्वेच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष दिल्याचा हा परिणाम आहे. माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कालावधीच्या तुलनेत अपघात कमी झाले आहेत. यादव यांच्या काळात ७००, बॅनर्जी यांच्या काळात ४०० आणि खर्गे यांच्या काळात ३८५ अपघात झाले होते. गेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत कमी झाले. ही एक महत्त्वाची सुधारणा मानली पाहिजे. रेल्वेसंदर्भातील गुन्हे नोंदविण्यात वेळ का लागत आहे ? या प्रश्नावर ते म्हणाले, राज्य रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल गुन्ह्यांचे प्रमाण शून्य व्हावे, यासाठी एकत्रित चर्चा करत आहेत.  

Related Articles