अंदमानच्या बेपत्ता पत्रकाराची हत्या चौघांनी केल्याचे उघड   

मृतदेह सापडला, तपास सुरू 

श्री विजयपूरम : अंदमानमधील स्थानिक पत्रकाराचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ते २९ मार्चपासून बेपत्ता होते. त्यांची एका महिलेसह चौघांनी हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.
 
शाहदेब डे (वय ३८), असे त्यांचे नाव आहे. रिपब्लिक अंदमान वृत्त वाहिनीचे ते मालक होते. डिगलीपूरच्या देशबंधू नगर येथील एका शेतात त्यांचा मृतदेह गुरुवारी सापडला होता. उत्तर आणि मध्य जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्वेता के. सुघाथन यानी सागितले, प्रकरण खुनाचे असून या प्रकरणी आम्ही महिलेसह चौघांना अटक केली आहे. खुनाचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक कारणातून आणि महिलेसोबत असलेल्या द्वेषातून हत्या झाल्याचे उघड होत आहे. अटक केलेल्यांची नावे पोलिसांनी उघड केली आहेत. त्यात डिगलीपूर येथे बार अँड रेस्टॉरंट चालविणारा गंगय्या आणि दोन कर्मचारी राम सुब्रमण्यम आणि रमेश आणि स्थानिक महिला ब्रितिका मलिक अशी त्यांची नावे आहेत ब्रितिकाने डे यांना २९ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेहरु युवा केंद्रात भेटायला बोलावले होते. तेव्हा तिच्यासोबत अन्य आरोपी होते. तेव्हा बितिकाने डे यांच्या दिशेने अवजड वस्तू फेकून मारली होती. त्यामुळे ते खाली कोसळले होते. मृतदेह नंतर देशबंधू नगर येथे नेण्यात आला आणि नंतर त्याची विल्हेवाट लावली होती. प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायवैद्यक अहवालातून अधिक माहिती उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, डे हे बेकायदा वाळू उत्खनन, लाकडाचा चोरटा व्यापार, जुगार आणि बेकायदा दारुविरोधात आवाज उठवत होते. 

Related Articles