खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल   

खाणसम्राट अनिल अग्रवाल यांचे मत

नवी दिल्ली : भारतीय भूगर्भशास्त्र जगात सर्वोत्तम असून उद्योगपती खनिजांच्या उत्खनात अव्वल आहेत. विकसित भारतासाठी ते योगदान देत आहेत. देशाला अधिक समृद्ध बनविण्यासाठी खनिजांचे उत्खनन अधिकाधिक केले पाहिजे, असे मत खाणसम्राट, वेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केले. 
 भारतीय भूमी तेल, वायू,  बॉक्साइट, कोळसा, लोखंड, तांबे आणि दुर्मीळ खनिजांनी युक्त आहे. 
 
त्याचे उत्खनन अधिक करण्याची गरज व्यक्त करताना अग्रवाल म्हणाले, भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्खनन करण्याची संधी सोडता कामा नये. देशाात खनिज विपुल असताना देखील आपण ६० टक्के खजिनांची आयात करत आहोत. त्यामध्ये तेल, वायू, सोने, तांबे, हिरे आणि अन्य धातूंचा समावेश आहे. विविध देश खाणकाम करत समृद्ध झाले आहेत. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आशियातील देशांचा समावेश आहे. आता भारताने दुर्मीळ नैसर्गिक साधन संपत्तीचा अर्थात खनिजांचे उत्खननावर भर दिला पाहिजे, असे आवाहन केले. त्या माध्यमातून विकास आणि समृद्धीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles