हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही   

राऊत यांचा भाजपवर हल्ला 

मुंबई, (प्रतिनिधी) : वक्फ दुरुस्ती विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबध नाही. भाजपला गोंधळ निर्माण करण्याची खाज आहे, अशी टीका करताना, आम्हाला भाजपने हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.
 
भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत फिरतो आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वक्फ सुधारक विधेयक आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. वक्फ संदर्भात जे विधेयक आले, त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे. पण, त्या विधेयकाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असे नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे या विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही पूर्णपणे पाठिंबा नाही, असा दावा राऊत यांनी केला.राहुल गांधी यांच्यावरील टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, इंदिरा गांधी यांनी अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? असा सवाल त्यांनी भाजपला केला.

Related Articles