कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची पातळी खालावली   

शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण 

शिवनेरी,(वार्ताहर) : जुन्नर तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने विहिरीची पातळी ठिकठिकाणी कमी झालेली पहावयास मिळत आहे.
एप्रिल मे जून या महिन्यात पाण्यासाठी शेतकर्‍यांना वन वन हिंडावे लागणार आहे. मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी शेतकर्‍यांना खूपच कसरत करावी लागत आहे. शेतातील उभ्या पिकाला सध्या वारंवार पाणी द्यावे लागत आहे. 
 
कुकडी पाटबंधारे विभागातील पाण्याचीधरणाची पातळी कमी झाल्याने धरण परिसर शेतकरी तसेच नदी व कालवा पाण्यावर अवलंबून असणारे सर्व शेतकरी नागरिकांना याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आजची कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची २१. ०४ टक्केवारी व पाणी पातळी उपयुक्त साठा ६२४५ आहे. मागील कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची २५. १७ टक्केवारी व पाणी पातळी उपयुक्त साठा ७४७० आहे.सांडवा वडज धरणातून २०० क्युसेक  व डिंभे धरणातून ४५० तसेच कालवा मधून येडगाव धरणातील ३ ५० क्युसेक, पिंपळगाव जोगे २२५ क्युसेक, डिंभे डावा क्युसेक ६०० व उजवा क्युमेक्स २०० तसेच विसापूर ९० क्युसेक पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे.येडगाव १८. ७१ माणिकडोह  ६. ३० वडज  ३६. ७५ पिंपळगाव जोगे  १९. २४ डिंभे  ३२. ५० विसापुर २९. १४  चिल्हेवाडी  २३. ९२ व घोड  २२. २८ अशी आजची धरणातील पाणीसाठा आहे.

Related Articles