वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी   

नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर मध्यरात्री उशिरा लोकसभेत मतदान पार पडले. अखेर हे विधेयक २८८ मते मिळवून मंजूर झाले.विधेयकाच्या बाजूने २८८ मते तर विधेयकाच्या विरोधात २३२ मते होती. 
 
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर झाले. वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.  “वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत कोणताही उल्लेख नाही. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे” अशी भूमिका हे विधेयक संसदेत सादर करताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा करून मतदान घेण्यात आले.
 
दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी देखील या विधेयकाच्या चर्चेवेळी आक्रमक भूमिका मांडली त्यामुळे लोकसभेत चांगलाच गोंळध झाल्याच पाहायला मिळाले. सरकार मदराशांना लक्ष्य बनवत आहे अशी भूमिका एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी मंडळी. आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील. बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील, या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही. दरम्यान यावेळी ओवैसी यांनी विधेयकाची प्रत देखील फाडली. तर दुसरीकडे सत्ताधारी खासदारांनी या विधेयकाचं जोरदार समर्थन केल्याचे पाहायला मिळाले. आता आज हे विधेयक राज्यसभेत सादर होईल. 

Related Articles