गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय   

बंगळुरु: गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बंगळुरुच्या सलामीवीरांना झटपट बाद केले. आणि शानदार गोलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने हा सामना ८ फलंदाज राखून जिंकला. 
 
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाने २० षटकांत १६९ धावा केल्या. यावेळी ८ फलंदाज बाद झाले. त्यामुळे गुजरातच्या संघाला १७० धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी सलामीवीर साई सुदर्शन याने जोरदार फटकेबाजी करत ४९ धावा केल्या आणि शानदार सलामी दिली. मात्र साई सुदर्शन याला हेझलवूड याने जबदस्त गोलंदाजी करत जितेश शर्माकडे झेलबाद केले.
 
त्यानंतर कर्णधार शुभमन गिल हा १४ धावांवर बाद झाला. गिल याला भुवनेश्वरकुमार याने चकविणारा चेंडू टाकला आणि जितेश शर्मा याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर जोस बटलर  याने नाबाद ७३ धावा केल्या. आणि हा सामना गुजरातला जिंकून दिला. त्याला साथ देणारा रुदरफोर्ड याने नाबाद ३० धावा केल्या. तर अवांतर ४ धावा संघाला मिळाल्या.गुजरातच्या गोलंदाजांपैकी महमद सिराज याने ३ फलंदाज बाद केले, तर आर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा, आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. साई किशोर याला २ फलंदाज बाद करता आले. 
 
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाचा सलामीवीर फिल सॉल्ट याने १४ धावा केल्या. त्याचा त्रिफळा सिराज याने उडविला. कोहली हा ७ धावांवर बाद झाला. पड्डीकल याने ४ धावा केल्या. त्याचा त्रिफळा देखील महमद सिराज याने उडविला. रजत पाटीदार याने १२ धावा केल्या. इशांत शर्मा याने त्याला पायचित बाद केले. लिंव्हिंगस्टन याने ५४ धावा केल्या. सिराज याने शानदार गोलंदाजी करत जोश बटलरकडे त्याला झेलबाद केले.
 
 जितेश शर्मा याने ३३ धावा केल्या. साई किशोर याने टाकलेल्या शानदार चेंडूवर राहुल तेवटिया याच्याकडे त्याला झेलबाद केले. कृणाल पांड्या मोठी धावसंख्या उभा करेल असे वाटत असताना साई किशोर याने शानदार गोलंदाजी करत स्वत: त्याचा झेल टिपत त्याला अवघ्या ५ धावांवर असताना झेलबाद केले. टिम डेविड याने ३२ धावा केल्या त्याचा त्रिफळा प्रसिद्ध कृष्णा याने उडविला. भुवनेश्वरकुमार हा १ धावेवर नाबाद राहिला. 
 
संक्षिप्त धावफलक 
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन ४९, शुभमन गिल १४, बटलर नाबाद ७३, रुदरफोर्ड नाबाद ३० अवांतर ४ एकूण १७.५ षटकांत १७०/२
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : 
फिल सॉल्ट १४, कोहली ७, पड्डीकल ४, रजत पाटीदार १२, लिविंगस्टन ५४, जितेश शर्मा ३३, कृणाल पांड्या ५, टिम डेविड ३२, भुवनेश्वर नाबाद १ अवांतर ७ एकूण २० षटकांत १६९/८ 

Related Articles