उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन   

जमैका : दिग्गज धावपटू आणि आठ वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट याचे वडील वेलेस्ली बोल्ट यांचे निधन झाले  उसेन बोल्ट याचे वडील वेलेस्ली बोल्ट फक्त ६८ वर्षांचे होते. पण बराच काळ आजारी होते. त्यांनी जमैका येथे अखेरचा श्वास घेतला. 
 
बोल्टच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हाती आलेल्या माहितीच्या आधारे बोल्टचे वडील वेलेस्ली त्यांच्या पत्नी जेनिफर बोल्टसोबत जमैकामध्ये एक लहान किराणा दुकान चालवत होते. उसेन बोल्टला जगातील सर्वोत्तम धावपटू आणि चॅम्पियन बनवण्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा होता. जमैकाच्या क्रीडा मंत्री ऑलिव्हिया ग्रेंज यांनी उसेन बोल्टच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस यांनीही समाज माध्यमांवर दु:ख व्यक्त केले आहे.

Related Articles