सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझीची मालकीण   

मुंबई : सारा तेंडुलकर ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये बहुप्रतिक्षित सिझन २ साठी मुंबई फ्रँचायझीच्या मालक म्हणून सहभागी झाल्याची घोषणा पुणे स्थित डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी जेटसिंथेसिसने केली आहे.
 
जीइपीएल ही जगातील सर्वात मोठी ई-क्रिकेट आणि मनोरंजन लीग असून ती आतापर्यंत ३०० दशलक्षाहून अधिक लाईफटाईम डाऊनलोड्स झालेल्या रियल क्रिकेट या खेळावर आधारित आहे. पहिल्या सिझनपासून, या लीगमध्ये अनेक पट वाढ नोंदवली गेलेली असून सिझन १ मधील २००,००० नोंदणींच्या तुलनेत आता ही नोंदणी ९१०,००० पर्यंत पोहोचली आहे. जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स १८ वर २.४ दशलक्षाहून अधिक मिनिटांचे स्ट्रीम केलेले कंटेंट आणि ७० दशलक्षाहून अधिक मल्टीप्लॅटफॉर्म पोहोच यामुळे जीइपीएलने क्रिकेट ईस्पोर्ट्समध्ये एक अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे.
 
मुंबई फ्रँचायझीची मालकी घेतल्याने सारा तेंडुलकरची या भागाशी असलेली घनिष्ठ नाळ अधोरेखित होते आणि लीगच्या प्रादेशिकीकरण, नवकल्पना, नेतृत्व आणि ईस्पोर्ट्ससाठीच्या बांधिलकीशी जुळणारी आहे. नव्या भारतातील विविध उद्योजकांसह जीइपीएल परिसंस्थेमध्ये तिचा सहभाग स्पर्धात्मक गेमिंगला नव्याने परिभाषित करण्याच्या आणि डिजिटल युगात क्रिकेट चाहत्यांचे प्रेम वाढवण्याच्या लीगच्या उद्दिष्टाला बळकटी देतो. जेटसिंथेसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक राजन नवानी म्हणाले: मुंबई टीमच्या फ्रँचायझी मालक म्हणून सारा तेंडुलकर यांचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सारा या खर्‍या अर्थाने देशाच्या भविष्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या भारतातील नव्या जेन न क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर इकोसिस्टमचे प्रतिनिधित्व करतात. खेळ आणि ईस्पोर्ट्समधील सारा यांना असलेली खोल रुची आणि त्यांची प्रचंड लोकप्रियता ईस्पोर्ट्सला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या ध्येयात त्यांना आदर्श सहयोगी बनवतात.

Related Articles