E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
समाज मनाचा कानोसा , सुरेश कोडितकर (मो. नं. ९५४५५२५३७५)
समाजमनाचा कानोसा घेत असताना समाजातील विविध गुण, अवगुण, सुख, दुःख, आशा, निराशा, अपेक्षा आणि अपेक्षाभंग या सर्वांचा आपण विचार करत आहोत. सामाजिक, कौटुंबिक, समूहात्मक, संस्थात्मक स्तरावर घडत असलेल्या अनेक घटनांचा भावनात्मक, मानसिक अभ्यास करण्याचा आपला मानस आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज प्रगतीसाठी झटत असतो. ही प्रगती राहणीमान, पैसा याची असती. प्रगतीसाठी झटणे हा मनुष्य सुलभ स्वभाव आहे. प्रगतीच्या शोधात माणसे घर, गाव, शहर, राज्य आणि देशसुध्दा सोडतात. चांगले शिक्षण, चांगले पॅकेज, चांगले जगणे आणि परदेश प्रवासाच्या संधीसाठी अनेक लोक महानगरांना प्राधान्य देतात.
शिक्षण आणि नोकरीच्या अल्पकालीन स्थलांतराला कोणाची ना असायचे कारण नाही; पण अनेकांचे परदेशी किंवा देशांतर्गत कायमचे स्थलांतर हे गाव आणि शहर दोन्ही स्तरावर संपूर्ण समाजाला त्रासदायक ठरेल अशा समस्यांना जन्म देत असते. स्थलांतरीत लोकांविरुध्द जगभर स्थानिक लोक आंदोलन करून विरोध करताना आपण पाहत आहोत. ज्या स्थलांतरामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि स्थानिक समाजही सुरक्षित राहतो, त्या स्थलांतराविरुध्द असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत नाही; पण स्थलांतरित लोक जर कट्टरतावाद आणि उग्र धर्मांधता जोपासत असतील, तर त्यांच्याविरुद्धही स्थानिक लोक विरोध करून त्यांच्या हकालपट्टीची मागणी करतात. स्थलांतरीतांपासून स्थानिकांच्या संरक्षणासाठी युरोपात कडक कायदे केले जात आहेत.
आपल्या प्रज्ञा, शिक्षण, कुशलता, सुप्त क्षमता या बळावर लोक शिक्षण आणि नोकरी या दोन्ही पातळ्यांवर राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावतात. त्या स्थलांतराला आकर्षण, चटक, रोजीरोटीचा आधार या आयामांची गरज नसते. क्षमता, मागणी, पुरवठा हे समीकरण इथे जुळलेले आपण यामध्ये पाहू शकतो. याउलट स्थानिक परिसराचा शासन आणि प्रशासनाने विकास न केल्यामुळे लोकांचे होणारे स्थलांतर हे निराशा, न्यूनगंड आणि नकारात्मकता यामुळे घडलेले असते. रोजीरोटी, उन्नती यासाठी असे जे स्थलांतर घडते. त्यामुळे भारतातील अनेक शहरे ही कोलमडण्याच्या स्थितीत पोहचली आहेत. शहराच्या आकर्षण आणि चटक यामुळे स्थलांतर करणारे लोक आपले गाव, कुटुंब, समाज यांनासुध्दा मागे सोडतात. परक्या शहरात स्थलांतरित होण्यासाठी ते गावाला परके होतात आणि महानगराच्या गर्दीत स्वतःला हरवून टाकतात. अशा ना गावच्या ना शहराच्या असलेल्या अधांतरी उपरे, पोटार्थी लोकांच्या मनाचा कानोसा घेतला तर आपल्याला काय समजेल? तसेच पोटार्थी अथवा उपरे ज्या शहरात आश्रय घेऊन त्यावर भार होतात, त्या शहरातील मूळ नागरिकांच्या मनाचा कानोसा घेतला तर आपल्याला काय समजेल? पोटार्थी अथवा उपरे भले त्यांच्या स्थलांतराचे समर्थन करतील. उपरे आणि पोटार्थीमुळे ज्या शहराच्या गळ्याभोवती फास आवळतो त्या शहराचे नागरिक स्थलांतरीतांविरुध्द मत मांडतील. अशा या संघर्षात गावे नष्ट होणार आहेत आणि शहरे फुगून ती कोसळणार आहेत. गावे ओसाड आणि शहरे बकाल या स्थितीची सर्वस्वी जबाबदारी स्थलांतरितांची आहे.
पुणे बदलले, सुख लोपले?
पुणे शहरावर महानगरीकरण लादले गेले हे आपण सर्व जाणतो. अन्यथा पुणे हे एक संथ, शीतल आणि मध्यमवर्गीय समाधानी शहर राहिले असते. शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभव हे पुण्याचे लेणे होते. सुसंस्कृत जीवनमान आणि सोयींची उपलब्धता हे जन्माने पुणेकरांचे सर्वस्व होते. दुर्दैवाने तेच पुणेकरांच्या मुळावर आले आणि पुण्याचा तोंडवळा आणि खाणाखुणा आमुलाग्र बदलून गेल्या. महानगरीकरण हे स्थलांतरितांच्या हिताचे आणि पुणे शहर आणि ग्रामीण भागाच्या अहिताचे सिद्ध झाले आहे. एक्स्प्रेस हायवे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, भूखंडाची विक्री, झोन बदल, दलाली, माहिती तंत्रज्ञान पार्क, औद्योगिक क्षेत्राला साहित्य आणि मजूर पुरवठा य मार्गे पुण्यात भलाबुरा पैसा खुळखुळू लागला आणि पुण्याच्या पावित्र्याला दृष्ट लागली. डोमकावळ्यांनी शाळा, महाविद्यालय यासाठी जमिनी हडपून विद्यापीठ उभारून डोनेशन, कॅपिटेशन फी, पेइंग सीट याव्दारे घाऊक लिलाव आरंभला आणि शिक्षणासह नोकरी, धंदा, कॉर्पोरेट आणि मल्टीनेशनलचा बोलबाला झाला. त्यानंतर लाखो लोक इथे आले आणि पुण्याचे कॉक्रीटीकरण, इमारतीकरण झाले. या सगळ्यात मूळ पुणेकरांचा आणि पुण्याचा कोंडमारा झाला. मूळ पुणे शहर या गर्दीत भांबावले आणि बाजूला पडले. सांप्रतात पुणेकरांच्या मनाचा कानोसा घेतला तर स्थलांतरित लोकांच्याबद्दल त्यांच्या भावना कडवट आहेत. कारण त्यांच्या जन्मस्थानाला, त्यांच्या वसलेल्या घरटयाला आता झाड, सावली, पाणी, निर्मळता, समाधान दुष्कर झाले आहे.
अस्वस्थ मने आणि पुणे
वेध अस्वस्थ मनाचा या परिसंवादाचे समस्त पुणेकरांच्या वतीने पुण्यात आयोजन करण्यात आले होते. त्या परिसंवादाचे सार हेच होते की स्थलांतरीतांमुळे सुसंस्कृत पुण्याचा र्हास झाला आहे. रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर असणारी गर्दी, वाढती गुन्हेगारी, अमली आणि मादक पदार्थांची सर्रास होणारी विक्री, विकासाच्या नावाने शहराला आलेले बकालपण आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे पुण्याची सांस्कृतिक ओळख बदलत चालली आहे. पुण्याबाहेरून आलेली माणसे याला कारणीभूत आहेत, असे ठाम मत समस्त पुणेकरांनी या परिसंवादात व्यक्त केले आहे. राजकीय अनास्था यामुळे विकासाला खीळ बसली आहे. खासगी शैक्षणिक संस्था, स्वायत्त विद्यापीठ यांनी त्यांच्या येथील बाहेरील विद्यार्थ्यांच्या हालचाली यावर लक्ष ठेवले पाहिजे. पुण्यातील सज्जनशक्ती निष्क्रिय झाली असून तिच्या एकत्रीकरणाने बदल घडेल असा आशावादही या परिसंवादात व्यक्त करण्यात आला आहे. पुण्याचे तत्कालीन चांगले पर्यावरण, ग्रामीण आवरण, नैसार्गिक वातावरण, स्वच्छता, पवित्रता, निवांतपणातील कामकाज उरक, बालकांची, महिलांची, ज्येष्ठांची सुरक्षितता, सात्विकता, धार्मिकता, संस्कार आणि अगत्यशीलता, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा, कलांची श्रीमंती याचे आताच्या पुण्यात तत्वयुक्त नामोनिशान कुठे शिल्लक आहे का? धूळ, धूर, उष्मा, घाम, केर, कचरा, राडारोडा, झुंड, टोळ्या, हल्लागुल्ला, अभ्यासिकांची चाळ, स्पर्धा परीक्षार्थी यांची दाटी, गुन्हेगारीचा कळस, गर्दीचा उच्छेद, कोंडीचा गुदमर यात हरवलेले पुणे शहर आता आपल्या मूळ आणि कुळ याच्या पाऊलखुणा शोधत आहेत. दुर्दैवाने त्या पुसल्या गेल्या आहेत आणि त्यांची जपणूक करणारे हरवले आहेत. पुढच्या पिढीच्या वाटयाला काय येणार आहे? ती पिढी तर केव्हाच परागंदा झाली आहे.
पुण्यासाठी चळवळ हवी!
ओरबाडणे हे स्थलांतरितांच्या सर्व स्तरात दिसून येते. स्थलांतरामुळे अकुशल मजूर ते अगदी उच्च विद्याविभूषित यांचा महानगरावर जगण्याचा होणारा भार शहरे ठप्प करत आहे, हे आपण पुण्याच्या सध्याच्या दुरवस्थेवरून पाहत आहोत. अशीच अवस्था देशातील अनेक शहरातील आहे. शहरांकडे धाव घेणारे गावाकडे ढुंकून पाहत नाही. गावंच्या गावं ओस पडली आहेत. विकासाचे प्रादेशिक असंतुलन आणि वाढणारा अनुशेष याचे एकत्रीकरण साधायचे कसे? मुंबईत लाखो लोकांच्या स्थलांतराने तेथील मराठी माणूस अल्पसंख्य झाला आहे. शिवाय देशाच्या सुरक्षेला धोका असणार्या बांगलादेशी घुसखोरांचे काय? पुण्यातील लोकसंख्येत मूळ पुणेकरांचा वाटा ३० ते ४० टक्क्यांपेक्षा अधिक नाही. ही धोक्याची घंटा आहे. पुणेकरांच्या मनाचा कानोसा घेण्याची इच्छा असावी लागेल आणि त्यासाठी वेळ द्यावा लागेल. तथापि अशी इच्छा आणि वेळ कोणाकडेही नाही.
Related
Articles
कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
सांगोला शहरात कारवर पॅराशूट कोसळले
01 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
सांगोला शहरात कारवर पॅराशूट कोसळले
01 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
सांगोला शहरात कारवर पॅराशूट कोसळले
01 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
सांगोला शहरात कारवर पॅराशूट कोसळले
01 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
3
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
4
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
5
कृषी पणन मंडळाकडून आंबा महोत्सव
6
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी